Sitabai Sangai Kanya Shala

1. ‍गणतंत्र दिवस

सीताबाई संगई कन्या शाळा, अंजनगांव सुर्जी वर्ग 5 ते 10

सीताबाई संगई कन्या शाळेच्या वतीने दरवर्षी 26 जानेवारी गणतंत्र दिवसानिमित्त वर्ग 5 ते 10 च्या विद्यार्थिनी विविध सामूहिक नृत्य, देशभक्तीपर समूहगान, योगासने, दंभेज यांमध्ये मोठया संखेने सहभाग घेऊन दर्जेदार कार्यक्रम सादर करतात.

2. NMMS परीक्षा वर्ग 8 वा गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त विद्यार्थिनी 15 MTS परीक्षा निकाल
राज्यस्तरावर 02
जिल्हास्तरावर 01
तालुकास्तरावर 07
प्रोत्साहनपर 02
‍विषेश पारितोषीक 04
3. चित्रकला स्पर्धा परीक्षा A ग्रेड प्राप्त
ELE 19
INT 15
4. मातृमंदीर विश्वस्थ संख्या (ज्ञानप्रबोधिनी) तर्फे आयोजित समुह गीत स्पर्धेत राज्यस्तरावर प्रथम क्रमांक
5. विज्ञान मेळावा 2019-20 तालुकास्तरावर द्वितीय क्रमांक
6. परीक्षेला बसलेल्या (173) वर्ग 10 वी चा निकाल सन 2019 : 98.26
प्राविण्य श्रेणी 98
प्रथम श्रेणी 40
90% 31
7. वर्ग 8 वा स्कॉलरशिप राज्यस्तरावर 1 गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त – 12
8. राज्यस्तरावर गुणवत्ता प्राप्त विद्यार्थिनी

कु. श्रृतिका मनिष येवले क्र. २२

9. सीताबाई संगई कन्या शाळा, अंजनगांव सुर्जी
जयंती / पुण्यतिथी
दिनांक कार्यक्रम
26 जुन राजर्षी शाहु महाराज जयंती
1 जुलै वसंतराव नाईक जयंती (कृषिदिन)
11 जुलै विश्व जनसंख्या दिन
23 जुलै लोकमान्य टिळक जयंती
1 ऑगस्ट अण्णाभाऊ साठे जयंती / लोकमान्य टिळक पुण्यतिथी
3 ऑगस्ट क्रांतिसिंह नाना पाटील जयंती
9 ऑगस्ट क्रांतिदिन
15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन
20 ऑगस्ट सद् भावना दिवस
8 सप्टेंबर जागतिक साक्षरता दिन
14 सप्टेंबर हिंदी दिन
16 सप्टेंबर जागतिक ओझोन दिन
2 ऑक्टोंबर महात्मा गांधी जयंती व लालबहादुर शास्त्री जयंती
8 ऑक्टोंबर महर्षी वाल्मीकी जयंती
31 ऑक्टोंबर इंदिरा गांधी पुण्यतिथी व वल्लभभाई पटेल जयंती
2 नोव्हेंबर शाळेचा वर्धापन दिन
14 नोव्हेंबर बालक दिन
19 नोव्हेंबर इंदिरा गांधी जयंती व राष्ट्रीय एकात्मता दिन
26 नोव्हेंबर संविधान दिन
28 नोव्हेंबर महात्मा फुले पुणतिथी
6 ‍डिसेंबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुण्यतिथी
20 डिसेंबर गाडगेबाबा पुण्यतिथी
24 डिसेंबर ग्राहक पंचायत दिन
29 डिसेंबर स्व. रायसाहेब मोती संगई पुणतिथी तथा
विद्यार्थी गुण गौरव दिन
3 जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती
12 जानेवारी स्वामी विवेकानंद जयंती / राष्ट्रीय युवा
दिन, जिजाऊ माँ साहेब जयंती
23 जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती
26 जानेवारी प्रजासत्ताक दिन
19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती
28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन
8 मार्च जागतिक महिला दिन
12 मार्च यशवंतराव चव्हाण जयंती
11 एप्रिल महात्मा जोतिबा फुले जयंती
14 एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती
29 एप्रिल स्व. बाळासाहेब संगई स्मृतिदिन
1 मे महाराष्ट्र दिन
21 मे दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिन
31 मे महाराणा प्रताप दिन
26 जून राजर्षी शाहू महाराज जयंती
10. करूणा इंटरनॅशनल, चेन्नई

करूणा इंटरनॅशनल, चेन्नई मार्फत शालास्तरावर करूणा क्लबची स्थापना करून त्याद्वारे विविध उपक्रम राबवले जातात.

11. सीताबाई संगई कन्या शाळेची उज्ज्वल यशस्वी परंपरा

अंजनगांव सुर्जी – विद्यादानात नेहमी अग्रेसर असलेल्या सीताबाई संगई कन्या शाळेने आपल्या उत्तरोत्तर यशाची परंपरा कायम ठेवली असून शाळेच्या उज्ज्वल यशात मानाचा तुरा खोवला आहे. मार्चमध्ये झालेल्या शालांत परीक्षेत या शाळेचा निकाल 98.26 टक्के लागला असून 90 टक्क्यांचा वर 31 विद्यार्थिनी आहेत.

उच्चविद्याविभूषित शिक्षकवर्ग, प्रशस्त मैदान आणि शैक्षणिक सोयी-सुविधांची उपलब्धता, समृध्द ग्रंथभंडार यामुळे शाळेच्या निकालात दिवसेंदिवस वाढच होत आहे. शाळेच्या विद्यार्थिनीसुध्दा केवळ अभ्यासातच हुशार आहे असे नसून वेगवेगळया स्पर्धांमध्ये मग ती बॅडमिंटन स्पर्धा, टेबल टेनिस, मैदानीस्पर्धा चित्रकला स्पर्धा वादविवाद स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, हया सर्वांमध्ये देखील अग्रेसरच राहतात.

12. राष्ट्रीय हरित सेना 2019-20

2006-2007 मध्ये सीताबाई संगई कन्या शाळा, अंजनगांव सुर्जी राष्ट्रीय हरित सेनेची स्थापना करण्यात आली. यामध्ये दरवर्षी 40 विद्यार्थीनीची निवड करण्यात येते. हरित सेनेच्या माध्यमातून शालेय परिसरातील वृक्षांचे संवर्धन करण्यात येते. 15 ऑगस्ट ला प्रमुख अतिथीच्या हस्ते वृक्षारोपण केल्या जाते. शालेय परिसर अनेक प्रकारच्या वृक्षांणी बहरलेला आहे. शाळेची विद्यार्थिनी कु. श्रृतिका रा. राऊत हिने सलग दोन वर्षे वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकवला आहे.

13. 29 डिसेंबर स्व. रायसाहेब मोती संगई पुण्यतिथी तथा विद्यार्थी गुणगौरव दिन

दरवर्षी 29 डिसेंबर ला “स्‍व. रायसाहेब मोती संगई” पुण्यतिथी तथा “विद्यार्थी गुण गौरव दिन” चे आयोजन केल्या जाते.

या दिवशी दहावी परीक्षेत गुणवत्ता यादीत आल्या बद्दल विद्यार्थिनींचा भेटवस्तु, स्मृतिचिन्ह देऊन सहकार केल्या जातो.

14. 29 एप्रिल स्व. बाळासाहेब संगई स्मृतिदिन

सीताबाई संगई शिक्षण संस्थेचे सचिव स्व. बाळासाहेब संगई यांच्या स्मृतिदिनानिमित्य दरवर्षी “स्वरांजलीचा” कार्यक्रम आयोजित केला जातो.

समाधीस्थळावर पुष्पांजली अर्पण केल्यानंतर विद्यार्थिनी भक्तीगीते, भावगीतांच्या सादरीकरणातुन आदरांजली व्यक्त करतात.

15. शालेय उपक्रम

शारदोत्सव/स्नेहसंमेलन

“संस्कारांचे व्हावे जतन-संवर्धन

त्यासाठी घडावे स्नेहसंमेलन”

साकार करणारे एक व्यासपीठ असते. त्याच अनुषंगाने सीताबई संगई कन्या शाळा, अंजनगांव सुर्जी च्या वतीने शारदोत्सवाच्या अंतर्गत स्नेह-संमेलनाचे आयोजन प्रतिवर्षी करण्यात येते.

1) ‘एक मिनीट स्पर्धा’ 2) ‘वक्तृत्व स्पर्धेतून’ 3) ‘रांगोळी स्पर्धा’

4) ‘मेहंदी स्पर्धा’ 5) ‘सुंदर हस्ताक्षर स्पर्धा’ 6) ‘प्रश्नमंजुषा’ 7) ‘गीतगायन स्पर्धा’

8) ­‘सांस्कृतिक कार्यक्रम’

अशा प्रकारे पाच दिवस शारदोत्सवाचा कार्यक्रम मुख्याध्यापक, पर्यवेक्षिका, प्रतिवर्षीचे उत्सवप्रमुख, प्रभारी शिक्षक, शाळेतील सर्वच साहाय्यक शिक्षकवृंद तसेच कर्मचारी वर्ग यांच्या सहकार्यांने व मदतीने मोठया उत्साहात व जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा होतो.

16. (ज्ञानप्रबोधनी)

मातृमंदीर विश्वस्त संस्था पुणे द्वारा आयोजित राज्यस्तरीय समुहगान व उतारा पाठांतर स्पर्धेत सीताबाई संगई कन्या शाळेनी दोनदा राज्यस्तरावर प्रथम क्रमांक मिळविला.

समुहगीताची निवड करतांना चालु घडामोडी, समस्या यावर जागृती करणारी गीते निवडण्यात आली. यामध्ये हो जाओ तय्यार साथियो (देशभक्तीपर) उधळीत शतकिरणा (स्फुर्तीगीत) व स्वच्छ निटके सुंदर जीवन (स्वच्छ भारत अभियान) गीते सादर करण्यात आली.

समुह गीतामध्ये 350 विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला.