सीताबाई संगई प्राथमिक शाळा, अंजनगाव सुर्जी

सातत्यपूर्ण सर्वकंष मूल्यमापन नियोजन
चाचणी – 1 सप्टेंबर 1/2 आठवडा
चाचणी – 2 जानेवारी 1/2 आठवडा
प्रथम सत्र परिक्षा दिवाळीपुवी
व्दितीय सत्र परिक्षा मार्च / एप्रिल
सामान्य ज्ञान परीक्षा 3 ऑक्टोबर / 14 नोव्हेंबर
MTS‍ परीक्षा जानेवारी शेवटचा रविवार
ऑलिंपियाड परीक्षा डिसेंबर – 4 था आठवडा
सहशालेय उपक्रम,
थोर पुरूषांच्या जयंती व पुण्यतिथी
क्र. जयंती /पुण्यतिथी दिनांक
1 लोकमान्य टिळक पुण्यतिथी 1 ऑगस्ट
2 शिक्षक ‍दिन 5 सप्टेंबर
3 म. गांधी जयंती 2 ऑक्टोबर
4 लाल बहादूर शास्त्री जयंती 2 ऑक्टोबर
5 तुकडोजी महाराज पुण्यतिथी 4 नोव्हेबर
6 बालकदिन 14 नोव्हेबर
7 महात्मा फुले पुण्यतिथी 28 नोव्हेबर
8 डॉ. आंबेडकर महानिर्वाणदिन 6 डिसेंबर
9 संत गाडगे बाबा पुण्यतिथी 20 डिसेंबर
10 स्व. रायसाहेब मोतीसंगई पुण्यतिथी 29 डिसेंबर
11 सावित्रीबाई फुले जयंती 3 जानेवारी
12 स्वामी विवेकानंद जयंती 12 जानेवारी
13 सुभाषचंद्र बोस जयंती 23 जानेवारी
14 शिवजयंती 19 फेब्रुवारी
15 डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती 14 एप्रिल
16 स्व. बाळासाहेब संगई स्मृतीदिन 29 एप्रिल
सहशालेय उपक्रम
क्र. उपक्रम कालावधी
1 हस्ताक्षर प्रकल्प (मराठी) 15 जुलै ते 14 नोव्हेबर
2 इंग्रजी प्रकल्प 15 जुलै ते 14 नोव्हेबर
3 स्वातंत्र दिन 15 ऑगस्ट
4 दहिहंडी कार्यक्रम (टिपरी नृत्य) माहे-ऑगस्ट
5 गणेशोत्सव माहे – सप्टेंबर
6 हळदी कुंकू कार्यक्रम जानेवारी 3 रा आठवडा
7 प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी
8 सांस्कृतिक कार्यक्रम जानेवारी चौथा आठवडा
9 सहल डिसेंबर / जानेवारी
10 पालकसभा मासिक
शालेय उपक्रम
क्र. उपक्रम
1 विज्ञान जत्रा – 2011
2 Maths Magic Exhibition – 2012
3 ग्लोबल वॉर्मिंग प्रदर्शनी – 2013
4 बालकृषि प्रदर्शनी – 2015
5 मेक इन इंडिया प्रदर्शनी – 2017
6 दफ्तर विना शाळा
7 ज्ञान रचनावाद प्रकल्प
8 The Project Learning English Words.
9 सुंदर हस्ताक्षर अभियान
10 निरंतर पाढे पाठांतर अभियान
11 आदर्श परिपाठ
12 पक्षी वाचवा अभियान
13 पतंगोत्सव – 2018
14 हर्षोल्हास – 2019 वर्षिक स्नेहसंमेलन
15 उमलती फुले – विद्यार्थी हस्तलित
16 विद्यार्थ्यांचे शब्दसाहित्य – विद्यार्थी लिखीत पुस्तक
शाळेच्या प्राप्ती / यश / फलनिष्पत्ती

श्री. अनिल केशवराव जुनघरे – मुख्याध्यापक

1. राष्ट्रीय एकात्मता फेलोशिप – 2006 – अखिल महाराष्ट्र पत्रकार व पत्रलेखन संघ, मुंबई
2. राष्ट्रस्तरीय शिक्षकरत्न सरस्वती सन्मान पुरस्कार – 2018 – मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी, मुंबई

सौ. वंदना किचंबरे – सहाय्यक शिक्षिका
1. आदर्श शिक्षकरत्न पुरस्कार – 2014 – अंगुलीमाल बहुद्देशीय सेवा संघ – नागपूर

राज्यस्तर खेळाडू / स्पर्धा
कु. जान्हवी संजय चिखले, वर्ग 4 था क
सकाळ बालमित्र चित्रकला स्पर्धा – राज्यात तृतीय

1. विज्ञान जत्रा 2011 – विद्यर्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव मिळावा तसेच त्यांच्या अंगी वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण व्हावा या उद्देशाने विज्ञान जत्रेचे आयोजन. वर्ग 1 ते 4 थी मधील, 120 विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष सहभाग असुन विविध प्रकारच्या 60 प्रतिकृतिंची निर्मिती व सादरीकरण. ज्ञान विकसित होण्याकरीता तोडा, जोडा व शिका हया क्रिया महत्वाच्या आहे. या क्रियेतुन विद्यार्थ्यांनी या प्रतिकृतीद्वारे वैज्ञानिक संकल्पना उदाहरणादाखल सादर केली. भारतीय वैज्ञानिकांची नावे विद्यार्थ्यांनी त्यांच्या कक्षाला दिली होती. आमदार कॅप्टन अभिजीत अडसुळ, मुख्याधिकारी रमाकांत डाके, संस्थेचे संचालक मंडळ तालुक्यातीत विज्ञान शिक्षक तथा विद्यार्थ्यांची भेट.

2. मॅथ मॅजिक एक्झीबिशन 2011 – 2012 हे प्रसिद्ध गणिततज्ञ डॉ. रामानुजन यांचे जन्मशताब्दी वर्ष होते. त्यानिमित्त भारत सरकारने हे वर्ष गणित वर्ष म्हण्न जाहीर केले होते. त्यानिमित्त प्राथमिक शाळेत मॅथ मॅजिक एक्झीबिशनाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांचा गणिताचा संबोध स्पष्ट व्हावा, गणिता विषयी त्यांच्या मनामध्ये आवड निर्माण व्हावी व त्यांच्या मनातील गणिताबाबतची भीती नाहीसी व्हावी हा या एक्झीबिशनचा उद्देश होता. यामध्ये 74 मॉडेल्सची निर्मिती असुन 148 विद्यार्थी प्रत्यक्ष सहभागी झाले होते. एक्झीबिशन ला उपजिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, बालवैज्ञानिक संदेश कलंत्रे, गटविकास अधिकारी अरविंद गुडधे, जिल्हा गणित अध्यापन मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र गायगोले नगराध्यक्ष्ज्ञ आदेश बोबडे, उपाध्यक्ष वैभव लेंधे, गटशिक्षणाधिकरी रामेश्वर माळवे यांची उपस्थिती होती.

3. ग्‍लोबल वॉर्मिंग प्रदर्शनी 2013 – आजचे युग हे तंत्रज्ञानाचे युग असुन शिक्षण पध्दतीवर तंत्रज्ञानाचा प्रभाव पडत आहे. देशाचीही भावी पिढी भारताचा विकास घडवू शकते. त्या करीता बालपणापासुनच विद्यार्थ्यांवर संस्कार होणे गरजेचे ग्लोबल वॉर्मिंग प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले. या विषयावर विद्यार्थ्यांनी तब्बल 101 मॉडेल्सची निर्मिती करून एकुण 202 विद्यार्थांनी “स्टॉप ग्लोबल वार्मिंग” चा संदेश शाळेच्या परिसरातून दिला. उद्घाटन राष्ट्रीय वन्यजीव सल्लागार मंडळाचे अध्यक्ष किशोर रिठे यांनी केले. शहरातील अनेक शाळेचे शिक्षक आणि परिसरातील किमान 10,000 विद्यार्थी तथा पालकांनी प्रदर्शनीचे निरिक्षण व अवलोकन केले. तहसिलदार शरयु आढे, प्रविण कविटकर, वर्षा पेटकर यांनी सदिच्छा भेटी दिल्या. परिसरातील विविध पक्षांचे घरटे ग्लोबल वार्मिंगचे पोस्टर्स सर्वांना आकर्षित करत होते.

4. भारतातील पहिली बालकृषी प्रदर्शनी 2015 – सीताबाई संगई सेमी इंग्रजी प्राथमिक शाळेत भव्य प्रमाणात ‘बालकृषी प्रदर्शनीचे’ आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनीचे उद्घाटन मकर संक्रांतीच्या शुभपर्वावर 15 जानेवारी 2015 ला उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी यांच्या हस्ते संपन्न झाले होते. प्रदर्शनीमध्ये कृषी अवजारापासुन ते बायोटेक्नॉलॉजी पर्यत शेतीला आधुनिकतेकडे नेणाऱ्या तंत्रज्ञानाचा अनोखा मेळ, देशभरातील शेतकरी बांधवांनी आत्महत्या न करता धैर्याने शेती करावी हा संदेश शेती मित्र साप, किटक, पक्षी यासह विविध उपयुक्त माहिती विद्यार्थी, पालक, शिक्षक, शेतकरी यांना मिळाली असुन अभ्यासाची सुवर्ण संधी प्राप्त झाली होती. विद्यार्थ्यांनी बनविलेले हर्बल गार्डन, संद्रीय शेती, कांदा चाळ, मातीविना शेती, जिवामृत प्रकल्प फुलशेती, नैसर्गीक शेती, मोबाईल राईस मिल यासारखे कृषीविषयी मॉडेल्स प्रदर्शनीमध्ये बघण्यासारखे होते. प्रदर्शनीला सकाळ ॲग्रोवन चे संपादक आदिनाथ चव्हाण, जि.प.कृषी अधिकारी अरूणा गोरले, शिक्षणाधिकारी श्रीराम पानझाडे, उपविभागीय कृषी अधिकारी अजय कुळकर्णी ॲगोवनचे वरिष्ठ व्यवस्थापक चंद्रशेखर जोशी यांनी सदिच्छा भेटी देऊन आयोजनाचे कौतुक केले.

5. भारतातील पहिली शालेक मेक इन इंडीया प्रदर्शनी – 2017 भारत सरकारच्या मेक इन इंडीया संकल्पनेला प्रोत्साहन देण्यासाठी व विद्यार्थांमध्ये बालवयातच देशभक्ती आणि राष्ट्रभक्तीची भावना निर्माण होण्यासाठी प्राथमिक शाळेत 10 ते 12 जानेवारी 2017 ला मेक इन इंडीया प्रदर्शनीचे आयोजन केले होते. त्याची वैशिष्टये – 1. वर्ग 1 ते 4 च्या विद्यार्थ्यांकडुन, 125 मॉडेल्सची निर्मिती व सादरी करण. 2. घराघरातून शौचालय बांधण्याकरिता बालविद्यार्थ्यांची आग्रहाची विनवणी. 3. कॅशलेस व्यवहाराकरिता जनजागृती. 4. डिजीटल इंडीयाच्या संकल्पनेला प्रोत्साहन. 5. स्वच्छ भारत मिशन. 6. स्वयंरोजगार निर्मितीकरिता प्रकल्प 7. स्वदेशीचा वापर. 8. शाश्वत शेती. गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील, आमदार रमेश बुंदिले, शिक्षण उपसंचालक एस.बी.कुळकर्णी, शिक्षण निरिक्षक मिलींद राजगुरे, खगोलशास्त्रज्ञ प्रविण विधळे माजी शिक्षणाधिकारी पंडीत पंडागडे, उपविभागीय अधिकारी विजय राठोड, तहसिलदार पुरूषोत्तम भुसारी, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी, गटशिक्षणाधिकारी अशोक गिरी, मुख्याधिकारी संदिप बोरकर, नगराध्यक्ष कमलकांत लाडोळे, अनेक पालक व परिसरातील किमान दहा हजार विद्यार्थ्यांनी भेट देवुन प्रदर्शनीचा आनंद घेतला.

6. पंतगोत्सव – मकर संक्रांतीच्या निमित्ताने सीताबाई संगई सेमी इंग्रजी प्राथमिक शाळेच्या वतीने 17 जानेवरी 2019 ला भव्य मैदानावर दुपारी 4 वाजता पतंगोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वर्ग 1 ते 4 च्या विद्यार्थ्यांनी एकाच वेळी तब्बल 150 पतंगी आकाशात उडविल्या. तसेच या निमित्ताने पतंगावरील लिखित संदेशाने समाजातील सार्वत्रिक समस्यांचा वेध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. विशेष म्हणजे कागदी पतंग आणि कापसाचा धागा वापरुन पर्यावरण रक्षणाचा संदेश यावेळी देण्यात आला अमरावती जिल्ह्यातील शालेय स्तरावरील एवढया भव्य स्वरूपाचे हे पहिलेच आजोजन होते. पतंगावरील पर्यावरण, स्वच्छता, दारूबंदी, प्लास्टिक बंदी, ध्वनी प्रदूषण, लोकसंख्या शिक्षण, आरोग्य, स्वदेशी वस्तुंचा वापर, सेंद्रीय खताचा वापर आणि अवयव दान या विषयावरील संदेश बघ्यांचे लक्ष वेधुन घेत होते. संस्थाध्यक्ष मुकूंद संगई, सहसचिव विवेक संगई, ग्राहक मंचचे पदाधिकारी आनंद संगई यांनी भेटी देवून आनंद व्यक्त केला.

7. हर्षोल्हास 2019 – प्रतीवर्षाप्रमाणे 2019 मध्ये सुध्दा दोन दिवसीय स्नेहसंम्मेलन आयोजित केले होते. ‘हर्षोल्हास’ या नव्या उपाधीने संपन्न झालेल्या स्नेहसंम्मेलनामध्ये प्रथम संस्थाध्यक्षाच्या शिक्षण क्षेत्रातील कार्याया उजाळा देणाऱ्या ‘रायसाहेबांचे आठवावे रूप’ ही नाटीका प्रारंभाला सादर करण्यात आली. प्रत्येक मुलाची आपल्या आई वडीलांप्रती संवेदना कायम राहावी. या हेतुने शाळा मुख्याध्यापक अनिल जुनघरे दिग्दर्शित ‘आई बाबा तुम्हा प्रणाम’ या चित्रफीतीचे पाहुण्यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. कलेच्या किरणांची उधळण करणाऱ्या या ‘हर्षोल्हास’ मध्ये किमान 500 विद्यार्थ्यांनी आपली कला सादर केली. कार्यक्रमाला प्राचार्य अंजली देव, संस्थाध्यक्ष मुकूंद संगई, तहसिलदार पुरूषोत्तम भुसारी, गटशिक्षणाधिकारी प्रकाश राक्षसकर, रविंद्र कोकाटे, वनश्री निंबाळकर सहसचिव विवेक संगई, भरत संगई, अजय संगई, विजया संगई, मेधा संगई, प्रामुख्याने उपस्थित होते.

8. दफ्तराविना शाळा – दफ्तराच्या अतिरिक्त ओझ्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर आणि अध्ययनावर विपरित परिणाम होऊ नये याकरिता शाळेत दर शनिवारी ‘दफ्तरविना शाळा’ हा वैविध्यपुर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. एक कृती आराखडा तयार केला असुन त्याद्वीर विद्यार्थ्यांना कृतीयुक्त आणि आनंददायी अध्ययन अनुभव देण्यात येतात. स्वंतत्र वेळापत्रानुसार वहया-पुस्तकांची संख्या कमी करून कृतीशील अध्ययन अध्ययनावर विशेष भर देण्यात येत आहे. या दिवशी विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकासाच्या दृष्टीने त्यांच्या आवडी निवडीचे कार्यक्रम राबविण्यात येतात.

9. माझी सेंद्रिय परसबाग – शाळेने सेंद्रिय ‘परसबाग लागवड’ हा नवीन उपक्रम हाती घेऊन विद्यार्थ्यांच्या कृतीशील आणि गतिशील अध्ययनाकरीता चांगली संधी उपलब्ध करून दिली आहे. विद्यार्थ्यांनी घरी उपलब्ध असलेल्या एका बीज प्रकारची केवळ एक बी शाळेत आणली. पाचशे विद्यार्थ्यांच्या प्रतिसादातुन तब्बल बावन्न प्रकारचे वान जमा झाले. जमा झालेल्या बियांचे जातवार गट करून त्या बिया वेगवेगळया पण पारदर्शक बरण्यामध्ये ठेवण्यात आल्या. विद्यार्थ्यांचे ही बावन्न गट करून गटानुसार त्यांना बियानांची ओळख करून देण्यात आली. सर्व बियांची विद्यार्थ्यांनीच स्वत: वेगवेगळया गटानुसार लागवड केली आणि बघता बघता 52 वाफ्यांची सुंदर परसबाग तयार झाली.

10. पक्षी वाचवा अभियान – उन्हाच्या तडाख्याने कमी होत चाललेल्या पाणी साठयामुळे माणसांची भटकंती होत आहे. लहान लहान पक्ष्यांची अवस्था मात्र यापेक्षाही वाईट आहे. प्रचंड तापमानात अन्न व पाणी मिळविण्याच्या प्रयत्नात पक्ष्यांवर जीव गमावण्याची वेळ आली आहे. ही जीवघेणी भटकंती थांबविण्यासाठी प्राथमिक शाळेत ‘पक्षी वाचवा अभियान’ राबविण्यात आले होते. पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी पक्ष्यांसाठी तब्बल 450 घरटे बनवुन शालेय परिसरात, झाडांना आणि इमारतीच्या आडोशाला अडकविली. घरटयाच्याशेजारी दाणे आणि पाण्याचीही व्यवस्था करण्यात आली होती. परिसरात पक्ष्यांचा किलबिलाट होता. काही पक्षी दाणे टिपत होती तर अनेक पक्षी नारळाच्या करवंटीत ठेवलेल्या पाण्याकडे आकर्षित होत होती.