सीताबाई संगई एज्युकेशन सोसायटी, अंजनगांव सुर्जी
स्व. बाळासाहेब संगई स्मृती
समाज प्रबोधन व्याख्यानमाला (त्रिदिवयीय)
14. NMMS (National Merit Means Scholarship)
NMMS परिक्षेकरिता शाळेतील वर्ग 8 चे 25 ते 50 विद्यार्थी दरवर्षी सहभागी होतात त्यापैकी दरवर्षी 5 ते 10 विद्यार्थी शिष्यवृत्ती करिता पात्र ठरतात.
29 डिसेंबर – स्व. रायसाहेब मोती संगई पुण्यतिथी तथा विद्यार्थी गुणगौरव दिन
सीताबाई संगई हायस्कुलच्या भव्य ‘स्व. रायसाहेब मोती संगई खुले रंगमंचावर’ दरवर्षी 29 डिसेंबर ला ‘स्व. रायसाहेब मोती संगई पुण्यतिथी तथा विद्यार्थी गुणगौरव दिन’ चे आयोजन केल्या जाते.
संस्थेचे संस्थापक स्व. रायसाहेब मोती संगई यांच्या समाधी स्थळी संस्थेचे संचालक मंडळ, संगई कुटुंबिक, शिक्षक-शिक्षिका यांच्या वतीने पुष्पांजली अर्पण केली जाते. त्यानंतर त्यांच्या जिवनावर भाषणे होतात. सर्व संस्थेच्या घटकातर्फे पुष्पांजली अर्पण केल्या जाते. भावगीत, भक्तीगीत, प्रार्थना ‘मै ज्ञानानंद स्वभावी हूँ’ ही विद्यार्थी-विद्यार्थीनी सामुहिक रित्या म्हणतात. त्यानंतर संस्थेमध्ये वर्षभरात घेतलेल्या, स्पर्धा, परीक्षा, खेळामधील नैपुण्य, बारावी-दहावी परीक्षेतील प्राविण्य श्रेणी मध्ये आलेल्या सर्व विद्यार्थी-विद्यार्थीनीचा या दिवशी मान्यवरांच्या शुभहस्ते गुणगौरव करून त्यांनी स्मृतिचिन्ह, भेटवस्तू दिल्या जातात.
29 एप्रिल – स्व. बाळासाहेब संगई स्मृतिदिन
सीताबाई संगई शिक्षण संस्थेचे सचिव तथा राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक स्व. बाळासाहेब संगई यांच्या स्मृतिदिना निमीत्त दरवर्षी 29 एप्रिल ला सकाळी त्यांच्या समाधीस्थळी सर्व संचालक मंडळ, संगई कुटुंबिय शिक्षक-शिक्षिका यांच्या वतीने पुष्पांजली अर्पण केल्या जाते. त्यानंतर ‘स्वरांजली’ च्या कार्यक्रमाचे आयोजन केल्या जात असते. दरवर्षी या स्मृतिदिनी नावाजलेले गायक, कलावंत येवून स्वरांजली चा कार्यक्रम सादर करतात.
‘सीताबाई संगई हायस्कुल, अंजनगांव सुर्जी’
सांस्कृतिक कार्यक्रम वर्ग – 5 ते 7
‘दरवर्षी गणतंत्र दिन’ 26 जानेवारी ला विद्यार्थ्यांच्या सूप्तगुणांना वाव मिळावा म्हणून वर्ग 5 ते 7 च्या विद्यार्थ्यांचे दर्जेदार नाविण्यपूर्ण ‘सांस्कृतिक’ कार्यक्रमाचे सादरीकरण केल्या जाते. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा सहभाग चांगला असतो.
1) आदिवासी संस्कृती दर्शन – सन 2019 (आदिवासी नृत्य कला दर्शन)
वर्ग 5 ते 7 च्या विद्यार्थ्यांनी ‘आदिवासी नृत्य कला दर्शन’ चे सादरीकरण केले. त्यामध्ये महाराष्ट्र आदिवासी नृतय, मध्यप्रदेश-गोंड नृत्य, मिझोराम-बांबू नृत्यांचा समावेश होता. या नृतय कला दर्शन मध्ये 100 विद्यार्थ्यांचा समावेश होता. काही विद्यार्थ्यांनी महिलांचा पोशाक परीधान करून नृत्य सादर केले होते. ‘आदिवासी नृत्य कला दर्शन’ पहिल्यांदा सादर केलयाबद्दल उपस्थितांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन, कौतुक केले.
2) स्व. रायसाहेबांचा पोवाडा – सन 2018
संस्थेचे संस्थापक ‘स्व. रायसाहेब मोती संगई’ यांच्या जीवनचरित्रावर आधारित वर्ग 5 ते 7 च्या 110 विद्यार्थ्यांनी ‘स्व. रायसाहेबांचा पोवाडा’ सादर केला. संपूर्ण पोवाडा हा विद्यार्थ्यांनीच म्हटला होता त्याला तबला व हार्मोनियमवर साथ सुध्दा विद्यार्थ्यांनीच दिली. पोवाडा नृत्य रूपात सादर करून संस्थेच्या 100 वर्षाच्या प्रगतिचा इतिहास या पोवाडा मधून रसीक वर्गाना कळाला. पोवाडा ऐकूण सर्वानी संस्थेच्या प्रगती बद्दल प्रशंसा केली. संस्थेचे अभिनंदन करून सदिच्छा व्यक्त केल्या.
3) ‘मला बाजाराला जायच बाई’ – सन 2017
वर्ग 6 च्या मराठी पुस्तकाच्या पाठयक्रमावर आधारित ‘मला बाजाराला जायच बाई’ हे भारूड वर्ग 5 ते 7 च्या 75 विद्यार्थ्यांनी सादर केले. कॅरीबॅगचा वापर टाळावा बाजारात खरेदी करायला जाताना कापडी पिशवी घेवून जावी. कॅरीबॅग वापरताना होणार दुष्परीणाम हा महत्त्वाचा संदेश या भारूड मधून उपस्थित रसीकवर्गाना दिला. ‘स्वच्छतेचे महत्व’ बद्दल या भारूड मधून हा संदेश देण्यात आला.
4) ‘दक्षिण भारतीय कथ्थक नृत्य’ – सन 2016
दक्षिण भारतातील प्रसिध्द असलेले ‘कथ्थक नृत्य’ वर्ग 5 ते 7 च्या 65 विद्यार्थ्यांनी सादर केले. प्राचीन काळी कथ्थक नृत्यला किती महत्व होते. आजही दक्षिण भारतात हे कथ्थक नृत्य सादर केले जाते. आपल्या विदर्भात असे कथ्थक नृत्य नेहमी सादर व्हावे हा विचार समोर ठेवून या कथ्थक नृत्याचे सादरीकरण विद्यार्थ्यानी केले.
5) ‘देविचा गोंधळ’ – 2014
वर्ग 5 ते 7 च्या 75 विद्यर्थ्यानी ‘देविचा गोंधळ’ हे सामुहिक नृत्य सादर केले. अंधश्रध्दा, अंधविश्वास, भानामती होण्यामागील कारणमिमांसा हया नृत्यामधून सादर केल्या गेली.
15 गणेशोत्सव
शाळेमध्ये दरवर्षी ‘गणेशोत्सव’ अंतर्गत विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात येत असते. प्रत्येक स्पर्धेत विद्यार्थी-विद्यार्थीनीचा सहभाग असतो ‘गणेशोत्सव’ मध्ये ‘सांस्कृतिक कार्यक्रम’ दर्जेदार होत असतात.
गणेशोत्सव स्पर्धा
वक्तृत्व स्पर्धा, प्रश्नमंजूषा, हस्ताक्षर स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, सामान्य ज्ञान स्पर्धा, खेळ व मैदानी स्पर्धा, संगीत खुर्ची, दोरीवरच्या उडया, सांस्कृतिक कार्यक्रम, कवितेच्या भेडया
भारतीय संस्कृती प्रदर्शनी सन 2014-15
सीताबाई संगई शिक्षण संस्थेच्या भव्य इमारतीमध्ये नाविण्यपूर्ण अशी भव्य ‘भारतीय संस्कृती प्रदर्शनी’ चे आयोजन केले होते. या मध्ये सीताबाई संगई हायस्कुल/कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थीनी यांनी सहभाग घेतला. भारतीय संस्कृती प्रदर्शनी मध्ये आपल्या देशातील विविध राज्यांचा या संस्कृतीमध्ये समावेश होता. त्यामध्ये महाराष्ट्र, दिल्ली, पंजाब, राजस्थान, मध्यप्रदेश, जम्मू काश्मीर, बिहार या राज्याची एकता आणि विविधता कशी आहे. प्रत्येक राज्याची विशेषता, प्रसिध्द स्थळे या बद्दल प्रदर्शनीमध्ये देखावे सादर केले. विद्यार्थी-विद्यार्थीनीच्या अथक परीश्रमाने, मेहनतीने ही प्रदर्शनी अविस्मरणिय ठरली. प्रदर्शनीला उपविभगीय अधिकारी, ठाणेदार, तहसिलदार, उपविभागीय पोलीस अधिकारी, रोटरी क्लबचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या सह अनेक मान्यवरांनी भेटी देवून आयोजित प्रदर्शनी चे तथा सर्व विद्यार्थी-विद्यार्थीनीचे, शिक्षक-शिक्षिका यांचे अभिनंदन केले.
29 डिसेंबर
स्व. रायसाहेब मोती संगई पुण्यतिथी व विद्यार्थी गुणगौरव दिन
या दिवशी गुणवताप्राप्त विद्यार्थ्यांचा मान्यवरीच्या हस्ते सत्कार होतो तसेच मुले भावगीत व भजने सादर करतात.
29 एप्रिल
स्व. बाळासाहेब संगई स्मृतीदिन
या दिवशी स्व. बाळासाहेब संगई यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून श्रध्दांजली वाहीली जाते. तसेच विद्यार्थी भजने व भावगिते सादर करतात.
महाराष्ट्र शासनातर्फे घेण्यात येणाऱ्या चित्रकला ग्रेड परिक्षेमध्ये आमच्या शाळेच्या खालील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.
एलिमेंटरी ड्रॉईंग ग्रेड परिक्षा – 2018-19
1) कु. प्राची सतिष घुसे
इंटरमिजीएट ड्रॉईंग ग्रेड परिक्षा – 2018-19
1) कु. सृष्टी जितेंद्र तळणकर
2) कु. वेदांती नरेंद्र हेंड
अंजनगांव सुर्जी येथील रायसाहेब मोती संगई इंग्लीश स्कुलचे विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत विविध खेळामध्ये भाग घेऊन यश मिळविले आहे.
जिल्हास्तर सहभाग
1) 14 वर्षाखालील मुली (Running)
(धावण्याची शर्यत)
100 मी. – तन्वी जिराफे – 2nd
200 मी. – वेदांती हेंड – 1st
400 मी. – वेदांती हेंड – 2nd
विभागीय सहभाग
1) फेन्सींग – पल्लवी सगणे
2) 600 मी. धावणे – जान्हवी भावसार
गणित संबोध परिक्षा – 2018-19
अमरावती जिल्हा गणित अध्यापक मंडळ अमरावती यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या गणित संबोध हया परिक्षेमध्ये रायसाहेब मोती संगई इंग्लीश स्कुल, अंजनगांव सुर्जी हया शाळेच्या चि. मल्हार स. घोडमारे वर्ग 5वा हया विद्यार्थ्यांने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. त्याने 61% गुण मिळविले. तसेच चि. हर्षल विलास सोनोने हया विद्यार्थ्यांने 59% गुण मिळवून तृतिय क्रमांक प्राप्त केला.
वरील विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय शाळेच्या मुख्याध्यापिका व शिक्षकांना दिले.
गणित प्रज्ञा परीक्षेसाठी निवड झालेले विद्यार्थी (इयत्ता 5 वी)
1) चि. मल्हार सचिन घोडमारे
2) चि. अमेय संजय साबळे
3) चि. हर्षल विलास सोनोने
4) चि. स्वराज निलेश घोडेकर
महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद पुणे अंतर्गत घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षेमध्ये रायसाहेब मोती संगई इंग्लीश स्कुलच्या विद्यार्थांनी यश संपादन केले.
शिष्यवृत्ती परिक्षा 2018 मध्ये शाळेतील इयत्ता 5 वी मधील 23 विद्यार्थी व इयत्ता 8 वी चे 12 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी इयत्ता 8 वी च्या 2 विद्यार्थींनी व एक विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले. यामध्ये कु. वेदांती नरेंद्र हेंड हिला 188 गुण 64.38% मिळाले व कलश विकास चिलात्रे हयाला 154 गुण 52.73% मिळाले. शाळेचे तिनही विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले.