29 डिसेंबर
स्व. रायसाहेब मोती संगई पुण्यतिथी व विद्यार्थी गुणगौरव दिन
या दिवशी गुणवताप्राप्त विद्यार्थ्यांचा मान्यवरीच्या हस्ते सत्कार होतो तसेच मुले भावगीत व भजने सादर करतात.
29 एप्रिल
स्व. बाळासाहेब संगई स्मृतीदिन
या दिवशी स्व. बाळासाहेब संगई यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून श्रध्दांजली वाहीली जाते. तसेच विद्यार्थी भजने व भावगिते सादर करतात.
महाराष्ट्र शासनातर्फे घेण्यात येणाऱ्या चित्रकला ग्रेड परिक्षेमध्ये आमच्या शाळेच्या खालील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.
एलिमेंटरी ड्रॉईंग ग्रेड परिक्षा – 2018-19
1) कु. प्राची सतिष घुसे
इंटरमिजीएट ड्रॉईंग ग्रेड परिक्षा – 2018-19
1) कु. सृष्टी जितेंद्र तळणकर
2) कु. वेदांती नरेंद्र हेंड
अंजनगांव सुर्जी येथील रायसाहेब मोती संगई इंग्लीश स्कुलचे विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत विविध खेळामध्ये भाग घेऊन यश मिळविले आहे.
जिल्हास्तर सहभाग
1) 14 वर्षाखालील मुली (Running)
(धावण्याची शर्यत)
100 मी. – तन्वी जिराफे – 2nd
200 मी. – वेदांती हेंड – 1st
400 मी. – वेदांती हेंड – 2nd
विभागीय सहभाग
1) फेन्सींग – पल्लवी सगणे
2) 600 मी. धावणे – जान्हवी भावसार
गणित संबोध परिक्षा – 2018-19
अमरावती जिल्हा गणित अध्यापक मंडळ अमरावती यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या गणित संबोध हया परिक्षेमध्ये रायसाहेब मोती संगई इंग्लीश स्कुल, अंजनगांव सुर्जी हया शाळेच्या चि. मल्हार स. घोडमारे वर्ग 5वा हया विद्यार्थ्यांने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. त्याने 61% गुण मिळविले. तसेच चि. हर्षल विलास सोनोने हया विद्यार्थ्यांने 59% गुण मिळवून तृतिय क्रमांक प्राप्त केला.
वरील विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय शाळेच्या मुख्याध्यापिका व शिक्षकांना दिले.
गणित प्रज्ञा परीक्षेसाठी निवड झालेले विद्यार्थी (इयत्ता 5 वी)
1) चि. मल्हार सचिन घोडमारे
2) चि. अमेय संजय साबळे
3) चि. हर्षल विलास सोनोने
4) चि. स्वराज निलेश घोडेकर
महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद पुणे अंतर्गत घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षेमध्ये रायसाहेब मोती संगई इंग्लीश स्कुलच्या विद्यार्थांनी यश संपादन केले.
शिष्यवृत्ती परिक्षा 2018 मध्ये शाळेतील इयत्ता 5 वी मधील 23 विद्यार्थी व इयत्ता 8 वी चे 12 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी इयत्ता 8 वी च्या 2 विद्यार्थींनी व एक विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले. यामध्ये कु. वेदांती नरेंद्र हेंड हिला 188 गुण 64.38% मिळाले व कलश विकास चिलात्रे हयाला 154 गुण 52.73% मिळाले. शाळेचे तिनही विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले.